नायगाव तालुक्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्याने एका युवकावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच काल रात्रीच्या सुमारास रुई शेत शिवारात बिबट्या दिसत असल्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास व्हायरल होताना दिसत आहे, त्यामुळे नायगाव तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे पुरावे मिळत असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस व वन विभागाच्या वतीने अगोदरच करण्यात आले आहे.