जळगाव: जामनेर नगराध्यक्षपदी साधनाताई महाजन बिनविरोध; कार्यकर्त्यांचा फटाके फोडून तुफान जल्लोष
मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या गेलेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीत भाजपने विरोधकांना जोरदार धक्का देत विजयाचे खाते उघडले आहे. माघारीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले सर्व तीन अर्ज मागे घेतल्यामुळे मंत्री महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात फटाके फोडून जल्लोष केला.