दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खननावर कारवाई; शासकीय कामात अडथळा आणून ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल. अंबड (जिल्हा जालना): अंबड तालुक्यातील मौजे दुधना नदी पात्रामध्ये अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार कार्यालयास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे आज महसूल पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी धाड टाकली असता, एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. नेमकी घटना: महसूल पथक घटनास्थळी पोहोचले असता, रोहित संजय जगत