बदलापूर पश्चिम येथील बेलवली परिसरामध्ये एका पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना आज दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरीची घटना रात्री उशिरा झाली असून चोरांनी पूजा साहित्य आणि दुकानातील रोख रक्कम लंपास केली आहे. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्हीची वायर देखील काढलेली होती. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.