गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी वैनगंगा नदीत सुरू केलेले जलसमाधी आंदोलन, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी दिलेले 'मंत्र्यांसोबत बैठकीचे' आश्वासन खोटे ठरल्याने, पुन्हा तीव्र झाले आहे. १३ डिसेंबरला नागपूरमध्ये महसूल मंत्री बावनकुळे व जलसंपदा मंत्री महाजन यांच्यासोबत बैठक लावून देण्याचे आश्वासन देऊनही बैठक न झाल्याने, संतप्त प्रकल्पग्रस्त भंडारा येथे परतले आणि त्यांनी नदीत उतरून पुन्हा आंदोलन सुरू केले. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे यांनी...