सेंदूरवाफा येथील लोकवस्ती असणाऱ्या परिसरात बिबट्या आढळून आल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने वनविभागाला निवेदन देऊन बुधवार दि.14 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता करण्यात आली आहे तसेच या परिसरात पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे त्यामुळे या परिसरात पथदिवे लावण्याचे निवेदन देखील नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे