सिंदखेड राजा: मेहकर येथे सायाळा येथील व्यापाऱ्यांचे चारचाकीचा काच फोडून २ लाख ५० हजार रुपये लंपास
सिंदखेडराजा तालुक्यातील सायाळा येथील समाधान शंकर जाधव हे सोयाबीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. २१ नोव्हेंबर रोजी मेहकर येथील एचडीएफसी बँकेतून २ लाख ५० हजार रुपयाची रोकड काढली. ब्राह्मण चिकना येथे जाण्यासाठी मेहकर शहरात आले व बुलढाणा अर्बन बँकेसमोर गाडी पार्क केली. बँकेत गेले असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून ड्रायव्हर बाजूचा काच फोडला आणि पैशांची थैली लंपास केली.याप्रकरणी समाधान जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मेहकर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.