नेवासा: पाणी पुरवठा प्रकल्पास ४४ कोटींची तत्वतः सुधारीत प्रशासकीय मान्यता
नगरोत्थान महाभियान नेवासा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास ४४ कोटी ४२ लाख रुपयांची तत्वतः सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. अधिक माहिती देताना आ.लंघे म्हणाले की, राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता नगरोत्थान महाभियान राबविण्यात येत आहे.