दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील मौजा बघोली येथे तीन दिवसीय शंकर पटाचे विधिवत उद्घाटन पार पडले. उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे, माजी समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, माजी उपसभापती राजकुमार यादव, महेंद्र चौधरी , सागर येळे , शंकर पटप्रेमी, शेतकरी गावातील गणमान्य नागरिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.