दक्षिण सोलापूर: औराद येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने उंदीर मारण्याच्या औषधा चे केले प्राशन...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने उंदीर मारण्याचे औषध पिल्याची घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. श्रीशैल भिमशा सरूर (वय वर्षे ३६), रा. औराद, ता. द. सोलापूर असे सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. त्याला उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णशुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिविल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती शनिवारी सायंकाळी सहा वाजता दिली.