भंडारा: दारूच्या नशेत टँकर चालकाची शाळकरी विद्यार्थिनीसह तिघांना धडक; जेवनाळा-पालांदूर राज्यमार्गावर भीषण अपघात!
दारूच्या नशेत बेफाम वेगात टँकर चालवत असलेल्या चालकाने सायकलने शाळेत जाणाऱ्या इयत्ता दहावीची विद्यार्थिनी काजल विनोद गोटेफोडे (वय १६) हिला जोरदार धडक दिली. या धडकेत काजल गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता या चालकाने पुढे येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांनाही धडक दिली. यात दुचाकीस्वार चंद्रभान गोंधोळे (वय ६०) यांच्या दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, चारचाकी चालकही गंभीर जखमी झाला.