राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या ९९ व्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या पाच दिवसांत राहुरी पोलिसांनी यशस्वी शोध घेतला आहे. २० डिसेंबर रोजी घरातून न सांगता निघून गेलेल्या मुलीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मुलगी सुस्थितीत सापडून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.