भंडारा नगर परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील एका उमेदवाराचे नाव मतमोजणीच्या वेळी चक्क मशीनमधून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून भंडारा शहरात फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे.