जिंतूर: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास केंद्रीय निवडणूक निरीक्षक निराला यांची भेट
जिंतूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास केंद्रीय निवडणूक निरीक्षक कृष्णकुमार निराला यांनी आज मंगळवारी भेट दिली. तसेच शहरातील दोन संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. जिंतूर-सेलू विधानसभा क्षेत्रात येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून जोरदार तयारी चालू आहे. यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.