जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजीता महापात्र (भा.प्र.से.) यांनी ‘अरुणोदय – सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहीम’ दि. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. सर्वांच्या संयुक्त व नियोजनबद्ध प्रयत्नांतूनच सिकलसेलमुक्त, निरोगी व सक्षम समाज घडविणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी