नेर: धनज येथे परसबाग काळाची गरज या विषयावर पार पडला कार्यक्रम
Ner, Yavatmal | Nov 28, 2025 दिनदयाल संस्थेअंतर्गत चालू असलेल्या किचन गार्डन प्रोजेक्ट माध्यमातून आपल्या गावात परसबाग लागवड माहिती आणि परसबाग काळाची गरज या विषयावर कार्यक्रम फकिरजी महाराज संस्थान धनज माणिकवाडा येथे पार पडला.या कार्यक्रमात आपल्या शरीरावर रासायनिक भाजीपाला सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि आपण आपल्या घरातच परसबाग लावून आरोग्य कसे जपता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला धनज माणिकवाडा मुक्त्यारपूर टाकळी या गावातील कॅडरसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.