भंडारा जिल्ह्यात रेती डेपोच्या नावाखाली झालेल्या अवैध रेती उत्खननाच्या संदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडला. रेती उत्खनन करणाऱ्या या कंपन्यांविरुद्ध 'मोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध उत्खनन झाल्याचे मान्य केले. तसेच, त्यांनी तत्कालीन तहसीलदार यांच्याविरुद्ध रेती चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे व उपविभागीय अधिकारी यांना...