वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुकुल कंप्युटर मौदा येथे 17 डिसेंबर बुधवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास संवाद बैठकीचे आयोजन करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलचा आढावा घेण्यात आला. तसेच मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी राज्य कार्यकारिणी जिल्हा प्रभारी कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष अजय शहारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष महानंदा राऊत, उपाध्यक्ष प्रकाश शंभरकर, तालुकाध्यक्ष जगदीश वाडीभस्मे आदी उपस्थित होते.