मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रेस क्लब दारव्हाच्या वतीने नगर परिषद मराठी शाळा क्रमांक २ येथे आयोजित व्याख्यानात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना भावनिक नात्यांचे महत्त्व पटवून दिले. “योग्य संवाद, समज आणि एकमेकांना वेळ दिल्यास आई-वडील व मुलांमधील नाते अधिक दृढ होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.