बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील मनुरवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून औताच्या दोरीच्या साह्याने मनुरवाडी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. गणेश विठ्ठल थोरात (वय 34) असं आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव असून यासंदर्भात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली असल्याचं बोललं जात आहे.