शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही तरुणांनी नशेत धुंद होऊन शाळकरी मुलींना छेडछाड केली. त्यावेळी त्या मुलींना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या शाळकरी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी ता. २ जानेवारीला सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. हा धक्कादायक प्रकार बसस्थानकातील कर्मचाऱ्यांच्या समोर घडला असला, तरी कोणीही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.