यवतमाळ: जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडून मतदान केंद्रांना भेट
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध निवडणूक क्षेत्रांतील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा पडताळा घेतला.जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी नेर येथील तहसील कार्यालय येथील स्ट्रॉंग रूमला भेट दिली. मतदान साहित्य वाटप, साहित्य घेणे या व्यवस्थेची पाहणी केली.