गोंदिया: संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या युवकास पकडले, बरबसपुरा परिसरातील घटना
Gondiya, Gondia | Jan 10, 2026 ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत बरबसपुरा ते आसोली मार्गावरील शेतात रात्रगस्त करीत असताना कमलेश देवकरण मोटघरे (४०, रा. कुऱ्हाडी, गोरेगाव) हा संशयास्पद स्थितीत वावरताना आढळला व पोलिसांना बघून पळाला. पोलिस हवालदार माने व भैसारे यांनी त्याला पकडून विचारपूस केली असता, तो योग्य उत्तर देऊ शकला नाही. शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री १:०५ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला