चांदूर बाजार: चांदूरबाजार तालुक्यातील वनी बेलखेड येथे, दोन गोठ्यासहित शेतीपयोगी साहित्य जळून खाक
आज दिनांक 13 डिसेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार तालुक्यातील वनी बेलखेड येथे दिनांक बारा डिसेंबरला सकाळी 11 वाजता चे दरम्यान घराला आग लागून दोन गोठ्यासहित शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत बेघर झालेल्या कुटुंबीयांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था तहसील विभागामार्फत करण्यात आली असून, नुकसानग्रस्त कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे तहसीलदार चांदूरबाजार यांनी स्पष्ट केले असल्याचे कळते