तालुक्यातील जंगलापूर शिवारात शेतातील स्प्रिंकलरवरील पितळी नोझल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार, दिनांक १८ डिसेंबरच्या रात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी सिद्धार्थ विश्वंभर पाटील यांनी शुक्रवारी (दि. १९ डिसेंबर) सकाळी ११ वाजता सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.