नगरपरिषदेसमोर भाजप एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये आमने-सामने आले, प्रचंड घोषणाबाजीने परिसरात तणाव
Beed, Beed | Nov 18, 2025 बीड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची छाननी आज नगरपरिषद कार्यालयात सुरू होती. या प्रक्रियेमुळे परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. संध्याकाळच्या सुमारास भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर कार्यालयासमोरून जात असताना अचानक एमआयएमच्या उमेदवार व कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षणिक आमनेसामने परिस्थिती निर्माण झाली. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले असले तरी वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.