विक्रोळीत तिप्पट रकमेच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
विक्रोळीत तिप्पट रकमेच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल गुंतवणुकीवर तिप्पट रकमेच्या आमिषाने एका महिलेसह तिच्या कुटुंबातील सदस्यांची सुमारे पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या शिवकुमार सोनावणे नावाच्या व्यक्तीविरोधात विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला तक्रारदार महिलेने एका व्यक्तीच्या सल्ल्यानुसार शिवकुमारशी संपर्क साधला. त्याने गुंतवणुकीवर शंभर दिवसात तिप्पट रकमेचे आमिष दाखवल्यानंतर या महिलेसह तिचे वडिल व दोन भावांनी त्याच्या कंपनीत साडेसात लाख रुपये गुंतवले.