कन्नड तालुक्यातील वासडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संजना जाधव यांनी आमदार आपल्या भेटीला कार्यक्रमांतर्गत भेट दिली.यावेळी प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.मुख्याध्यापिका धाटबळे यांनी शाळेच्या विकास व अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली.शाळेतील भौतिक सुविधा व शैक्षणिक गरजांवर सखोल चर्चा करण्यात आली.आमदार संजना जाधव यांनी शाळांना प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली.टप्प्याटप्प्याने शाळेच्या अडचणी सोडवून कायापालट करण्याचे आश्वासन दिले