ग्रामपंचायत कोकणा/जमी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत संगणीकृत वाचनालय व ग्रंथालयाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. सदर वाचनालयाचे उद्घाटन सडक अर्जुनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अक्षरदीप रोकडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, पंचायत समिती सदस्य सपनाताई नाईक, माजी उपसभापती डॉ. अविनाश काशीवार, मधुसूदन दोनोडे, आदी मान्यवर प्रामु