वैजापूर: चांदेश्वरी धरण प्रश्न, शाळा शैक्षणिक समस्या, रस्त्यांचे प्रश्न या संदर्भात वाकला येथे धरणे आंदोलन
चांदेश्वरी धरण प्रश्न, शाळा व शैक्षणिक समस्या यासोबतच वाकला परिसरातील रस्ते या संदर्भात सोमवार तारीख 29 रोजीपासून समाजसेवक प्रशांत निकम हे वाकला येथील बस स्थानक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.चांदेश्वरी धरण प्रश्न मार्गी लावावा, शाळा व शैक्षणिक समस्या बाबत गांभीर्याने विचार करावा व त्यासंदर्भातची प्रश्न सोडवावी,यासोबतच परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे काही रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून देखील ते रस्ते होते की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.