पवनी: शेतात अस्वलीचा वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला! कलेवाडा येथील घटना
Pauni, Bhandara | Nov 29, 2025 अड्याळ वनपरिक्षेत्र हद्दीत येत असलेल्या कलेवाडा शेतशिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महिलेवर अस्वलीने हल्ला केला. मनोरमा मोरेश्वर घोगरे (५५) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. नेमके त्याच वेळी बाजूला काम करीत असलेला मुलगा व पती लगेच हातात काठ्या घेऊन धावले. आरडाओरड करीत अस्वलीला हाकलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्यावरही त्या अस्वलीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती जंगलाच्या दिशेने पळून गेली.