औसा मतदारसंघातील कामांसाठी ६ ग्रामीण मार्ग सुधारणा व नाली बांधकामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला. रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रमांतर्गत सांगवी ते सांगवीवाडी, राज्य मार्ग २३७ ते मुदगडवाडी, जाऊवाडी ते राज्य मार्ग २४४, आलमला ते आलमलातांडा तालुका हद्द व राज्य मार्ग २३८ ते नांदुर्गा या ५ मार्गासाठी तसेच एकंबीवाडी रस्त्यावरील विहीर क्रमांक १ व २ शेजारील संरक्षण भिंत व नाली बांधकामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.