आज दिनांक 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जालना भोकरदन मुख्य मार्गावर भोकरदन तालुक्यातील बाणेगाव फाट्यावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे,एक ट्रक जालण्यावरून भोकरदनच्या दिशेने जात होता, तर दुसरा ट्रक भोकरदन वरून जालण्याच्या दिशेने माल घेऊन जात होते ,यावेळी दोन्हीही ट्रकचा समोर समोर भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहे,त्यांची नावे मात्र कळू शकलेली नसून त्यांच्यावर जिल्हा रुग्णाण्यात उपचार सुरू आहेत.