भंडारा: विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेचा IFSC कोड बदलला; ३ महिन्यांचे कमिशन थकल्याने राशन दुकानदारांवर आत्महत्या करण्याची वेळ!
भंडारा जिल्ह्यातील सरकारी रास्त भाव दुकानदारांना मागील ५ महिन्यांपैकी जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांचे कमिशन मिळाले. मात्र ज्या रास्त भाव दुकानदारांची खाती पूर्वीच्या विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेत (सध्याची महाराष्ट्र ग्रामीण बँक) आहेत, त्यांची कमिशनची रक्कम बँकेच्या IFSC कोड आणि खाते क्रमांकात झालेल्या बदलामुळे त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या तांत्रिक बदलामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक रासन दुकानदारांचे कमिशन अडकून पडले असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.