नांदेड: नाईक नगर येथे फिर्यादीला चाकूने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली विमानतळ पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Nov 30, 2025 दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री बाराच्या दरम्यान नाईकनगर नांदेड येथे, यातील आरोपी सोरंज सावंत रा.आंबेडकरनगर नांदेड याने यातील फिर्यादीस जुन्या भांडणाचे कारणावरुन खंजरने फिर्यादीचे डोक्यात पाठीमागुन मारहान करुन गंभीर दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी अनिकेत देविदास भालेराव, वय 24 वर्षे, व्यवसाय पानटपरी रा. नाईकनगर नांदेड यांचे फिर्यादवरुन विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये आरोपी सोरंग सावंत विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ तेलंगे, मो.नं. हे करीत आहेत