देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंदोरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तेरवीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत झाले आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीवर लाकडी काठीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे."याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे 18 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे