गोपीनाथ मुंडे जयंती: पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी, म्हणाल्या 'बाबा लाडक्या बाळासारखे होते' गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी अभिवादन केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. 'आमच्या घरातलं सगळ्यात लाडकं बाळ असल्यासारखे मुंडेसाहेब होते', असे भावूक उद्गार पंकजा मुंडे यांनी काढले. त्या म्हणाल्या, 'एक मुलगी म्हणून जे सन्मानपूर्वक वागून मुंडेसाहेबांनी आम्हाला दिली ती वागणूक जर सर्व मुलींना त्यांच्या वडिलांनी द्या