फिर्यादी मंडळ अधिकारी आकाश बेलसरे यांच्या तक्रारीनुसार 12 डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजता च्या सुमारास आरोपी संतोष समालपुरिआ हा एम एच 29 बीई 4142 क्रमांकाच्या सहा चाकी वाहनात तीन ब्रास रेती अवैधरित्या चोरी करून वाहतूक करत असताना मिळून आला असता आरोपीच्या ताब्यातून रेती व वाहन असा एकूण बारा लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच 13 डिसेंबरला अंदाजे दीड वाजताच्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.