*अमरावती शिक्षक मतदार संघाची प्रारूप यादी प्रसिद्ध;* *दावे-हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत* अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत, दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी 3 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या कार्यालयात ही यादी नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध असून, यामध्ये सध्या 8 हजार 104 मतदारांची नोंदणी झाली आहे.