मंगळवार पेठ परिसरात दिवसा घरफोडी करून सुमारे ७ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सुनिल मल्हारी तलवारे (वय ३८) व विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले. तपासात चोरीतील दागिने विक्रीस दिल्याचे निष्पन्न झाल्याने शिवानंद दशरथ मोची (वय ४०) यालाही अटक करण्यात आली. आरो