भंडारा: भंडाऱ्यात भरदिवसा घरफोडी; ६३ हजारांचा ऐवज लंपास
शहरालगतच्या व्यंकटेशन नगर, भोजापूर परिसरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी दीपककुमार लक्ष्मण माने (६७, रा. नागपूर, मूळ रा. भोजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे भोजापूर येथील घर बंद असताना दि. २० ते २१ डिसेंबर दरम्यान ही चोरी झाली. घरातील झाडांना पाणी देण्यासाठी आणि साफसफाईसाठी ठेवलेल्या महिलेला घराचा दरवाजा तुटलेला दिसल्याने ही घटना उघ