औसा: शिवणी येथे दोन घरे फोडली ; ४ लाखांचा ऐवज पळविला ; औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ausa, Latur | Mar 7, 2024 औसा तालुक्यातील शिवणी येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून दागिने व रोख रकमेसह चार लाखांची धाडसी चोरी केली. याबाबत औसा ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवणी गावातील अमर जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रकमेसह दोन लाख आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच शेजारी राहणारे गोपाळ सूर्यवंशी यांच्या घरातदेखील सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून एक लाख साठ हजारांची चोरी केली.