जाधव मंडी येथे पोलिसांवरती संताप जनक प्रकार पोलिसांनी चक्क हॉटेल विक्रेत्याची खिचडी दिली रस्त्यावर फेकून
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 20, 2026
आज दिनांक 20 जानेवारी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या मुजोरीचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका खिचडी विक्री करणाऱ्या तरुणाची तयार खिचडी थेट रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली आहे. शहरातील जाधवमंडी परिसरात रात्री उशिरा शेतकरी पालेभाज्या विक्रीसाठी येतात. त्यांच्यासाठी जेवणाची सोय व्हावी म्हणून येथील छोट्या हॉटेलवर नाश्ता व खिचडी तयार केली जाते. मात्र, रात्री उशिरापर्यंत हॉटेल कसे सुरू ठेवले, असा सवाल करत पोलिसांनी हॉटेलमध्ये तयार होत असलेल्या खिचडीचा पातेलाच रस्त्याव