ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत टेमनी ते बरबसपुरा रस्त्यावर आरोपी हा संशयास्पद स्थितीत वावरताना पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकाला आढळून आला. पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या खिशातून पिवळ्या काळ्या रंगाची लोखंडी पेन्चीस आणि एक टेस्टर मिळाले. सदर कारवाई दिनांक 9 जानेवारीला करण्यात आली. आरोपीविरुद्ध कलम 122 (क) महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.