आज दि.21 डिसेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट व शरद पवार राष्ट्रवादी गटावर जोरदार टीका केली आहे व आता जिल्हा परिषद पंचायत समिती व महापालिका निवडणुकीनंतर हे दोन्हीही पक्ष अस्तित्वात राहणार नाही, कारण भाजपाच हा एक नंबरचा पक्ष राहणार आहे ,असा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.