पवनी: तुकुर-टुकुर पाहिल्याच्या वादातून शिरसाळा येथे तिघांकडून दाम्पत्याला मारहाण; अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल
शिरसाळा येथे ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान झालेल्या दोन घटनांमध्ये, एका ४७ वर्षीय शेतकरी दाम्पत्याला केवळ 'टुकुर-टुकुर' पाहिल्याच्या क्षुल्लक वादातून गावच्या 3 आरोपींकडून लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करण्यात आली. फिर्यादी नवनाथ कासिराम आकरे (वय ४७) हे सायंकाळी त्यांच्या घरासमोर बसले असताना आरोपी क्र. १ 17 वर्षीय विधी संघर्ष बालिका यांनी जाताना त्यांना "माझ्याकडे टुकुर टुकुर पाहत आहे" असे बोलून अश्लील शिवीगाळ केली.