दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अर्जुनी शिवारातील वैनगंगा नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून तिची वाहतूक करणाऱ्या दहाचाकी टिप्परला दवनीवाडा पोलिसांनी पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.२०) पहाटे २ वाजताच्या सुमारास परसवाडा ते तिरोडा जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. यात तब्बल २० लाख ४२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. -- संतोष पुरभाजी दीपके (४५, रा. नागार्जुन कॉल