आज दि २८ डिसंबर रोजी रात्री १० वाजता माध्यमाना माहिती मिळाली की मित्रांसोबत चहाची तल्लफ भागविण्यासाठी जात असताना दुचाकीचा अपघात झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हतनूर टोलनाक्याजवळ रामगोपाल पेट्रोलपंप परिसरात घडली. अर्शद गुलाब पठाण (वय १९, रा. कन्नड) असे मृत युवकाचे नाव असून, मोटारसायकलला अपघात झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो घटनास्थळीच गतप्राण झाला.