आयटीनगरी माण, ता. मुळशी येथील बापूजीबुवा घाटात गाडीने कुत्र्याच्या पिल्लाला उडवण्याची घटना घडली. यात कुत्र्याचे पिल्लू जखमी झाले.आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी या रस्त्यावरचे सर्वच्या सर्व गतोरोधक काढले असल्याने गाड्यांचा विना अडथळा बराच वेग असतो. त्यामुळे आता प्रवाशांना तसेच रस्त्याच्या आजूबाजूच्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे.