धुळे: धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार; पुढील दोन दिवस ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा
Dhule, Dhule | Dec 1, 2025 प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर रोजी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तापमानात लक्षणीय घट होऊन कडाक्याची थंडी जाणवू शकते. ३ डिसेंबरपासून पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धुळ्यासह नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांसाठीही कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे.